महत्वाचे पेज

सरकारी योजना

🔶 प्रधानमंत्री प्रकाश पथ योजना (उजाला योजना)
Pradhan Mantri Prakash Path Yojana

• देशात ऊर्जा संवर्धंनासाठी सुरू करण्यात आलेल्या LED आधारित घरगुती कार्यक्षम प्रकाश कार्यक्रमांचे नामकरण उजाला योजना असे करण्यात आले आहे.
उजाला म्हणजे Unnat Jyoti by Affordable LEDs for All.
 
• उजाला योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्यातील भोपाळामधून करण्यात आली.
उजाला योजनेची कार्यवाही केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या 'Energy Efficiency Services Limited (EESL) कंपनीव्दारे 125 हून अधिक शहरांमध्ये राबविण्यात येत आहे.

🔷 उजाला योजनेचा उद्देश -

• देशात वापरात असणारे 77 कोटी तापदीप्त दिव्यांच्या (Incandescent Lamps) जागी LED दिवे बसविणे. उजाला योजनेअंतर्गत वापरात येणार्‍या बल्बची पॉवर 9 वॅट इतकी असून या बल्बची वॉरंटी 3 वर्षे एवढी आहे.LED बल्ब बाजारात 160 रु. किंमतीस उपलब्ध होतील; परंतु BPL कार्डधारकास तो 85 रुपयांस उपलब्ध होईल.

🔷 उजाला योजनेची वैशिष्ट्ये -

या योजनते प्रत्येक वर्षी 20 हजार मेगावॅट ऊर्जा बचत होईल.या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी 9 कोटी बल्बचे वितरण करण्यात येईल.या योजनेअंतर्गत जे बल्ब वितरित केले जातात ते बल्ब इतर बल्बच्या तुलनेत 10% अधिक प्रकाश देतात.

🔶 स्वयंप्रभा डिजिटल योजना

इयत्ता नववी ते पीएचडीपर्यंतचे दर्जेदार शिक्षण देशातील कोणालाही घरबसल्या उपलब्ध करून देणाऱ्या 'स्वयंप्रभा डिजिटल योजनेची' अनोखी व क्रातिकारी भेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुपौर्णिमेनिमित्त देशाला दिली.
 
देशभरातील विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये असलेले सुमारे 72 लाख ग्रंथांचे ज्ञानभांडार जनतेसाठी खुल्या करणाऱ्या या योजनेचे लोकार्पण 9 जुलै रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले होते.
 
राष्ट्रपतीपदावरून पायउतार होण्यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी प्रणव मुखर्जींचा शिक्षण क्षेत्राशी संबंधित हा अखेरचा कार्यक्रम होता.
 
'डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन' या राष्ट्रीय योजनेत स्वयं, स्वयंप्रभा डिजिटल प्लॅटफॉर्म, नॅशनल डिजिटल लायब्ररी आणि नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझिटरी या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे.

🔷 स्वयंप्रभा डिजिटल प्लॅटफॉर्म -

ही योजना टेलिव्हिजन संचावर, 32 वाहिन्यांव्दारे आठवड्याचे सातही दिवस 24 तास चालणारी डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा आहे.
 
स्वयं (मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स उर्फ 'मूक') व्दारे या वाहिन्यांवरून सर्व इयत्ता व अभ्यासक्रमांशी संबंधित विषयांच्या व्हिडीओंचे हिंदी व इंग्रजी भाषेत प्रक्षेपण केले जाईल.
 
इयत्ता नववी ते पीएचडीपर्यंतच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याची संधी यामुळे साऱ्या देशाला उपलब्ध होणार आहे. हे व्हिडीओ प्रादेशिक भाषांतही उपलब्ध करून देण्यात येतील.

1 comment: